तरुणीची बदनामी करणाऱ्या दोघा भामट्यांना पोलिसांनी केले गजाआड

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-सोशल मीडियावर तरुणीची बदनामी करणाऱ्या दोघा तरूणांना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे.

याप्रकरणी पिडीत तरूणीच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान राहुल संजय शिरसाठ,

विशाल सदानंद साबळे (दोघे रा. शेलुखडसे ता. रिसोड जि. वाशीम) असे अटक केलेल्या तरूणांचे नावे आहेत. त्यांना गुरूवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर शहरातील एका तरूणीची राहुल शिरसाठ सोबत व्हॉट्सअपवर मैत्री झाली. राहुल याने तरूणीकडे अश्‍लील फोटोची मागणी केली.

तरूणीने राहुलला फोटो पाठविले. राहुलने तरूणीकडे पुन्हा अश्‍लील फोटोची मागणी केली. फोटो दिले नाही तर सोशल मिडीयावर फोटो टाकून बदनामी करील अशी धमकी राहुलने तरूणीला दिली.

पिडीत तरूणीने याबाबत कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी तांत्रिक तपास करून आरोपी विषयी माहिती काढली.

आरोपीची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी आरोपीच्या शेलुखडसे (जि. वाशीम) गावी जाऊन शोध घेतला. रिसोड पोलिसांच्या मदतीने राहुल व त्याला मदत करणारा विशाल साबळे याला ताब्यात घेतले.

राहुलकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने पोलिसांना सांगितले, विशालच्या मोबाईलवरून तरूणीला अश्‍लील संदेश पाठविले व तरूणीचे इंस्टाग्रामवर फोटो टाकल्याची कबूली राहुल याने पोलिसांना दिली.

पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान या दोघा तरुणांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe