अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-नायलॉन मांजा विक्री आणि वापराला बंदी असतानाही जिल्ह्यासह शहरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री केली जात असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे.
पतंगबाजीसाठी या मांजाचा वापर होत असल्याची पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांचा आदेश धाब्यावर बसवून चोरी छुप्या पध्दतीने नायलॉन मांजाची विक्री तसेच वापर करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
मकर संक्रांतीच्या पार्शवभूमीवर नायलॉन मांजाविक्री करणारे विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली. तोफखान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील
अजय पतंग सेंटर येथे चोरून नायलॉन मांजाची विक्री करतांना अजय बाबासाहेब राऊत याला ताब्यात घेण्यात आले असून पंचासमक्ष मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
त्यात १५ हजार किमतीचा नायलॉन मांज्याच्या ५० चकऱ्या, ९ हजार रुपये किमतीचा मांजा गुंडाळण्याचा ३ मशीन आणि २६,५८० रोख रक्कम जप्त करण्यात आले.
त्याच प्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीद विविध ठिकाणी ३ कारवायांमध्ये ३१०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अश्या प्रकारच्या विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी तोफखाना पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved