बेकायदा दारू विक्रेत्यांवर पोलिसांची संक्रांत; लाखोंचा माल केला हस्तगत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-नुकताच नाताळ सण झाला असून आता नवीन वर्ष काही दिवसांवर आले आहे, यामुळे अनेक ठिकाणी दारूचा पूर वाहत असतो. तसेच अनेक ठिकाणी अवैध दारूचा सुळसुळाट झालेला देखील पाहायला मिळतो.

यामुळे पोलीस पथके सावधान झाले आहे. त्यानुसार पोलिसांकडून ठिकठिकाणी धाडसत्र सुरु करण्यात आले आहे. नुकतेच श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरासह सरस्वती कॉलनी, कदमवस्ती, सुतगिरणी परीसरात दारुबंदी उत्पादन शुल्क विभागाने छापे टाकून दारु बनवण्याच्या रसायनासह एकूण 4 लाख 87 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.

नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, अहमदनगर यांनी धडक कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अहमदनगर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक गणेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान 25 डिेसेंबर 2020 रोजी सकाळी गोंधवणी परीसर, सरस्वती कॉलनी, कदमवस्ती, सुतगिरणी परीसरात छापे मारुन तब्बल 4 लाख 87 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात 9 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment