अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-नेप्ती कांदा मार्केट येथे व्यापाऱ्याला खंडणी मागणा-या तिघांना नगर तालुका पोलिसांची अटक केली.
व्यापारी महेश जवाहरलाल भराडिया (रा. वांबोरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अक्षय दिलीप कोके (रा. अक्षदा गार्डनसमोर, नगर), हर्षवर्धन महादेव कोतकर (रा. एकनाथनगर, केडगाव), राजेंद्र गोरख रासकर (रा. चास ता. नगर) असे अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जमिनीचा व्यवहार मोडला, म्हणून तुला पैसे द्यावे लागतील, असे आरोपी फिर्यादीला फोनद्वारे तसेच दुकानात येऊन म्हणत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
नंतर जबरदस्तीने 20 हजार रुपये मागितले. त्यानंतर अक्षय दिलीप कोके व त्याबरोबर एक अनोळखी व्यक्ती यांनी हर्षवर्धन महादेव कोतकर याला फोन लावला. त्यानंतर कोके यांचेकडे पैसे दिले.
कोके याने कोतकर याला फोन करून सांगितले की, पैसे मिळाले. त्याचवेळी साधे गणवेशात बसलेल्या पोलिसांनी आरोपी कोके व त्यासोबत असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतले. सहायक निरीक्षक राजेंद्र सानप तपास करीत आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved