पोलीस इन ऍक्शन मोड; वाळू तस्करांवर कारवाई सुरु

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांना रोख बसावा यासाठी पोलीस पथके सक्रिय झाली आहे. पाऊले ठिकठिकाणी धाडसत्र, कारवाया सुरु करण्यात आलेल्या आहेत. यामुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे.

नुकतेच संगमनेर मुळा नदीपात्रातून बेकायदेशिररित्या वाळू उपसा करून तिची वाहतूक करणारा डंपर घारगाव पोलिसांनी पकडला.

याप्रकरणी एका जणाविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 15 लाख रुपयांचा डंपर व 20 हजार रुपयांची वाळू असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, मुळा नदीपात्रातून विना परवाना, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून वाळू उपसा करून तिची वाहतूक करणारा डंपर एम. एच. 14, ईएम 6542 हा बुधवारी मध्यरात्री घारगाव पोलिसांनी घारगाव शिवारात पकडला.

याप्रकरणी पोलीस शिपाई हरिश्चंद्र बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत पोपट साबळे (रा. अकलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजू खेडकर करत आहेत.