तोफखानाचा कारभार आता पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या हाती

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हरूण मुलाणी यांना पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे.

दरम्यान त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातील निरीक्षक सुनील गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान तोफखानचे नूतन पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी शुक्रवारी रात्री पदभार स्वीकारला.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबतचे आदेश काढले आहे. निरीक्षक गायकवाड पूर्वी कर्जत पोलीस ठाण्यात निरीक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची नियंत्रण कक्षात बदली झाली होती.

त्यांना आता तोफखाना पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळाली आहे. शहरातील महत्वाचे पोलीस ठाणे असलेल्या तोफखाना हद्दीतील सावेडी परिसरातील वाढत्या चोर्‍या, घरफोड्या, सोनसाकळी चोरीच्यरिक्षा ना रोखण्याचे आव्हान निरीक्षक गायकवाड यांच्या समोर आहे.