मोबाईल शॉपी लुटणाऱ्या सराईत चोरट्यांना पोलिसांनी केले गजाआड

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- राजूर येथे मोबाईल शॉपी फोडून माल लुटणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, राजूर येथील तौफिक आयुब तांबोळी यांचे २७ ऑक्टोबर रोजी मोबाईल शॉपीचे दुकान फोडण्यात आले होते. याबाबत तौफिक यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेत ३० हजार ३५३ रुपयांचे दुकानातील साहित्य चोरून नेण्यात आले होते.ही चोरी घाटघर येथील विष्णू विठू सोडनर याने केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या चोरट्याने ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले. व तातडीने या चोरट्याने ताब्यात घेतले. यावेळी चोरट्यांची कसून चौकशी करण्यात आली.

यामध्ये त्याने समशेरपूर येथील चिंचाचे वाडी येथील सोमनाथ शिवाजी भूताम्बरे याच्या मदतीने मोबाईल फोडली असल्याची त्याने कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी भूताम्बरे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेही चोरी केल्याची कबुली दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe