जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; १० जणांना घेतले ताब्यात

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाचे संकट काहीसे कमी होताना दिसत असताना मात्र दुसरीकडे जिल्ह्यात अवैध धंद्यांचा मात्र सुळसुळाट झालेला दिसून येत आहे. दरदिवशी पोलिसांकडून जिल्ह्यात धाड सत्र सुरूच आहे.

यातच श्रीरामपूर शहर पोलिसांनी नुकतीच एका ठिकाणी छापा टाकून काही जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहर पोलिसांनी येथील शिवाजीरस्ता परिसरासह प्रभाग तीनमधील साई टेकडीसमोरील जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली.

दरम्यान पोलिसांनी तातडीने या जुगार अड्डयावर मंगळवारी रात्री छापा टाकून १० जणांना ताब्यात घेतले. याबरोबर विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन लाखांचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. विविध ठिकाणच्या जुगार अड्ड्यावर आढळलेल्या दहा आरोपीविरुद्ध रात्री शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासुन पोलिस पथकाने विविध ठिकाणी छापे टाकून शहरातील अवैध व्यवसायांवर कारवाई केली. ही कारवाई पोलिस उपधीक्षक संदीप मिटके यांच्यासह प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी केली. शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News