जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 17 जण ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- गेल्या काही दिवसात जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. यातच जुगार अड्डे वाढले असून दरदिवशी जिल्ह्यात कोठेना कोठे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा पडतच असतो.

यातच कोल्हार येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. नाशिक विभाग पोलिसमहासंचालकांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

यामध्ये17 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून 2 लाख 29 हजाररुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोल्हार बुद्रुक येथील राजूरी रोडलगतउपनगरातील लोकवस्तीजवळ अनेक दिवसांपासून हा जुगार अड्डा सुरू होता.

खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीवरुन नाशिक पोलिस महासंचालक प्रताप दिगावकर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस पथकाने काल रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास येथे अचानक छापा टाकला.

यावेळी कारवाई करीत 17 जणांना ताब्यात घेतले. येथून 58 हजार 850 रुपये रोख रक्कम, सहा मोटारसायकल व जुगार साहित्यासह 2 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.