दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; लाखोंचा माल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  नवीन वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या काळात बेकायदा मद्यविक्रीचा सुळसुळाट पाहायला मिळत असतो. याला आळा बसावा यासाठी पोलीस पथके देखील ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेली असतात.

नुकतेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नगर विभागाने आज श्रीरामपूर तालुक्यात सुरु असलेल्या एका दारू अड्ड्यावर छापा घातला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नगर विभागाने आज श्रीरामपूर तालुक्याजवळ गोंधवणी परिसरात मोठी कारवाई केली.

या छाप्यात तब्बल 4 लाख 87 हजार रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी प्रभाकर किसन गायकवाड, माणिक सोमाजी शिंदे,

कचरू गायकवाड (फरार) (सर्व राहणार गोंधवणी, श्रीरामपूर) तसेच उषा प्रभाकर काळे, चंद्रकांत शाम पवार,( रा. कदमवस्ती, श्रीरामपूर,) साधना मोहन काळे, वंदना संतोष काळे,

(रा. सूतगिरणी परिसर, श्रीरामपूर), इंदुबाई विष्णू जाधव, मीना लाला माने, (रा. सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर, जि.अहमदनगर)असे एकुण 09 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागकडून केलेल्या धडक कारवाईमुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.