अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-जामखेड शहरातील विविध ठिकाणी पोलीसांचे मटका व ताडी केंद्र वर पोलीसांनी कारवाई केली आहे.
जामखेड शहरातील अवैध्य धंदे पुर्ण पणे बंद करण्यात येतील असे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी गुप्त बातमीदार मार्फत मिळाली की जामखेड शहरातील बाजार तळ येथे अवैध्य रित्या ताडी विक्री चालू आहे.
पोलीस पथकाने तातडीने संबंधित ठिकाणी छापा घालत कारवाई केली. याप्रकरणी कैलास शाहूराव पवार (वय ४८ रा. महादेव मंदिर जवळ, जामखेड) यास ताब्यात घेतले.
सदर ठिकाणी सुमारे ४०८० / रु.किंमतीची ताडी मिळुन असल्याने त्यास पोलीस स्टेशनला आणुन त्याचे विरोध गुन्हा दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ बापू गव्हाणे हे करीत आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये