छापा टाकून १६ हजार ७५० रुपयांची दारु पोलिसांनी केली जप्त

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- जामखेड तालुक्यातील खर्डा रोड काॅर्नर व खर्डा येथे छापा टाकून १६ हजार ७५० रुपयांची दारु पोलिसांनी जप्त केली. नवीनच आलेले पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी ही कारवाई केली.

पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या पथकातील हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब गव्हाणे, संग्राम जाधव, आबासाहेब अवारे, संदीप राऊत, संदीप आजबे, अरुण पवार, अविनाश ढेरे,

शिवलिंग लोंढे यांनी खर्डा रोडवर छापा टाकला असता राजेंद्र श्रीधर पवार (३९, शिवाजीनगर, नान्नज) हा प्लास्टिकच्या गोणीत बाटल्या ठेवून विदेशी दारू विकत असल्याचे आढळले.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेत ९५२० रुपयांच्या बाटल्या जप्त केल्या. खर्डा येथे हाॅटेल स्वागतच्या आडोशाला दारू विक्री सुरू होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment