अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलाला एक – दोन नव्हे तर चक्क वीस नव्या कोऱ्या गाड्या दिल्या जाणार आहे.
दरम्यान जिल्हा पोलीस दलाला वेगवान करण्यासाठी डीपीसी फंडातून या 20 गाड्या देण्यात येणार आहे. या गाड्या एसपींकडे सुर्पूद करण्यात येणार आहे.
दरम्यान यामध्ये 5 स्कॉर्पिओ आणि 15 बोलेरो अशा वीस नवीन गाड्या जिल्हा पोलिस दलास जिल्हा नियोजनमधून देण्यात येणार आहे.
या नव्या गाड्या मिळाल्याने जिल्हा पोलीस दल अधिक वेगवान होईल असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. पालकमंत्री मुश्रीफ हे उद्या नगर जिल्हा दौर्यावर आहेत.
मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते दुपारी दोन वाजेच्या सुमारास या गाड्या एसपींना प्रदान केल्या जातील. तसेच तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्राची सुरूवातही मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते होणार
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved