अवैध व्यावसायिकांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक ; २२ आरोपींना ताब्यात घेत ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी नुकतीच शहरातील विविध पोलीस स्टेशनला भेटी देऊन ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध व्यवसाय आढळून येतील त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश आले होते. त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेला अवैध धंद्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

या आदेशानुसार पोलिस दिलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या विरोधात शनिवारी व रविवारी धडक मोहीम राबविली. जिल्ह्यातील ऑनलाईन बिंगो जुगार, अवैध देशी, विदेशी, गावठी दारु अड्डे अशा १६ ठिकाणी छापेमारी करत २२ आरोपींना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून २ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नुकत्याच घेतलेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेसह सर्वच पोलिस ठाण्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले होते.

या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांनी त्यांचे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याद्वारे २ दिवस विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत जिल्ह्यात १६ ठिकाणी कारवाई करण्यात आली.

यामध्ये किशन संजय कांबळे (रा. सोळातोटी कारंजा, अहमदनगर), नितीन राजन्ना भिंगारे (रा. राज चेंबर मागे, मंगलगेट, अहमदनगर), राजेंद्र विलास पवार (रा. खातगांव टाकळी, ता. नगर) रमेश गुंजाळ (रा. लिंपणगांव, ता. श्रीगोंदा), मयुर दिलीप कांबळे, वेंकटेश रामचरण सोनकरीवार (रा. श्रीगोंदा कारखाना, ता. श्रीगोंदा), ऋषीकेश शदर राक्षे (रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा), राधेशाम शिवशंकर तिवारी (रा. देवदैठण, ता. श्रीगोंदा), बिराजदार धोंडीबा कऱ्हाडे (रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा) यांच्या विरुद्ध अवैध गावठी, देशी दारू विक्री प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.

इम्रान अब्दुल रहिम शेख, युनूस चाँद शेख (दोन्ही रा. कुकाणा, ता. नेवासा), उत्तम दौलत कोल्हे (रा. शहर टाकळी, ता. शेवगांव), संदीप भाऊसाहेब मोरे (रा. बत्तरपुर, ता. शेवगांव), सुरेश लक्ष्मण नजन, रामेश्वर भरतरी नजन, भारत बाबासाहेब चोपडे (तिन्ही रा. भातकुडगांव, ता. शेवगांव) यांच्या विरुद्ध ऑनलाईन जुगार प्रकरणी गुन्हे दाखल करून १ लाख २५ हजार ७४० रोख रक्कम, साधने, १ सॅमसंग, ३ विवो, १ रेडमी कंपनीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

गणेश विष्णु आंधळे (रा. सोनसांगवी, ता. शेवगांव), शौकत दिलदार शेख (रा. राक्षी, ता. शेवगांव), ऋषीकेश उध्दव पातकळ (रा. चापडगांव, ता. शेवगांव), ज्ञानेश्वर आण्णा उरुणकर (रा. मिरी, ता. पाथर्डी), राजु जनार्दन सातपुते (रा. साकेगांव, ता. पाथर्डी), गणेश आबासाहेब कराळे (रा. कामत शिंगवे, ता. पाथर्डी) यांच्यावर अवैध देशी, विदेशी दारु विक्री प्रकरणी गुन्हे दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान खासदार निलेश लंके यांनी पोलीस प्रशासनाविरुद्ध उपोषण केले होते. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासन जनताभिमुख काम करत नसल्याचा आरोप केला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe