अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे पुत्र कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या आदेशावरून गुरुवारी कोपरगावचे शिवसेनेचे उपनगराध्यक्ष योगेश बागूल यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा उपमुख्याधिकरी सुनील गोर्डे यांच्याकडे दिला.
शिवसेनेच्या गटनेत्यानेच पक्ष श्रेष्ठींना डावलल्याने बागूल यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिल्याचे तालुक्यात चर्चा रंगल्या. आता या प्रकरणात शिवसेनेचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले.
राज्यात व केंद्रात सेना-भाजपची युती तुटून आमने-सामने आले असले तरी सेनेचे काही नगरसेवक राजकीय स्वार्थापोटी भाजप सोबत कायम आहेत.
शिवसेनेचे गटनेते भाजपच्या माजी आमदारांच्या पुत्राचे आदेश कसे काय पाळतात? असा सवाल शिवसैनिकांना पडला आहे. त्यामुळे गटनेते पदाचा बागुल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसैनिक करत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved