अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे रद्द करण्यासाठी गेल्या 12 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले.
शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’च्या समर्थनार्थ मंगळवारी (ता.8) अकोले तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.
सोमवारी यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांचे अध्यक्षतेखाली विश्रामगृहावर बैठक झाली. यावेळी ‘अकोले बंद’ ठेवण्याबाबत नियोजन करण्यात आले.
कोतूळमध्ये ‘भारत बंद’च्या हाकेला अल्प प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच सर्व दुकाने चालू होती. तसेच राजूरमध्येही बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved