Ahmednagar News : सोशल मीडिया हा तरुणाईच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तरुणाई सोशलमीडियावर सक्रिय असते. त्यामुळे काय त्या फोनमध्ये डोके खुपसून बसला आहे, असे वाक्य प्रत्येक घरातून ऐकायला येते.
आजच्या तरुणांना नावं ठेवणाऱ्यांची काही कमी नाही. आजच्या मुलांना सामाजिक जाणीवा नाहीत असे देखील काहीजण टोमणे मारतात. मात्र याच सोशलमीडियाचा सकारात्मक वापर केल्यास कित्येक दिवस होणारी कामे काही क्षणात मार्गी लागत असल्याचे आपण पाहतो. असेच याचे ताजे उदाहरण म्हणजे श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील एक तरुणाने काही तासात रास्ता करून दिले आहे.
आज सर्व सोशल मीडियाचा वापर करतात. मात्र आपण पाहतो अनेक चुकीच्या घटना याच सोशल मीडियामुळे देखील घडतात मात्र सोशल मीडियाचा वापर आपण जर चुकीच्या मार्गाने केला तर त्याचा परिणाम चुकीचा येतो.
पण जर आपण सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी केला तर त्याचा परिणाम देखील चांगलाच होतो. याचे उदाहरण म्हणजे श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील दिल्यास वावगे ठरणार नाही.
पावसाळ्यात चिखलातून येजा करणे अवघड होत असल्याचे पाहून सोशल मीडियाच्या माध्यमातून निधी जमा करून रस्त्यावर मुरुम टाकून तो रस्ता वाहतुकीयोग्य करण्याची किमया श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील एका अवलियाने करून दाखविली आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करणे चूक असल्याचे मत या तरुणाने खोडून काढले आहे.
तालुक्यातील गळनिंब येथील असलेल्या बंधाऱ्यावरून संक्रापूर व राहुरी येथे ये-जा करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्याने त्याच्या शेतातून रस्ता दिला. परंतु तो कच्चा असल्याने पावसाळ्यात रस्त्यावर चिखल होऊन दळणवळणास खूप अडथळे येत होते.
कधी कधी पायी चालणे देखील कठीण होत असे. गळनिंब येथील दोन शाळकरी मुले या रस्त्याने जात असताना चिखलातून जाताना पडली. एक दुचाकी घसरून दोघेही चिखलात पडले.
हे पाहून त्यांनी या रस्त्याने ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त दोनशे रुपये फोन पे करण्याची विनंती केली. काही तासातच दहा ते अकरा हजार रुपयांचानिधी जमा झाला. मग शेरमाळे व देठे यांचाही उत्साह वाढला.
त्यांनी जिजाबापू वडितके व जेसीबीचे, ट्रॅक्टर मालक योगेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही मदत करण्याचा निर्णय घेतला. परिश्रमातून व शेतकरी, ग्रामस्थांनी दिलेल्या योगदानातून संक्रापूर बंधाऱ्यावरून गळनिंबकडे जाणारा रस्ता दुरुस्त झाला.