पोस्ट कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, सापडलेले १३ हजार केले परत !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- पोस्ट ऑफिसमधील टपाल पॅकर सुधाकर गोरडे यांना शिंगणापूर येथील पोस्ट विमा एजंट भाऊसाहेब दंडवते यांची १३ हजार रुपयांची पैशाची पिशवी काऊंटरवर आढळली.

त्यांनी प्रामाणिकपणे पोस्ट मास्तर राजेंद्र नानकर, डाक व आवेशक संजय ढेपले यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांनी याबाबत दंडवते चौकशी करून त्यांना ती परत केली.

गोरडे यांनी एक हजारांची गोरडेंची बक्षीसाची रक्कमही नाकारली. दंडवते हे सोमवारी कोपरगाव पोस्ट कार्यालयात आले होते. त्यांच्याकडील पिशवीत १३ हजार रुपयांची रोकड होती.

ही पिशवी काऊंटरवरच विसरले. सायंकाळी कार्यालय बंद करताना ही पिशवी सुधाकर गोरडे, श्रावण बनसोडे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी पोस्टमास्तर नानकर यांचेकडे दिली.

या पिशवीची खातरजमा झाल्यावर दंडवते यांना परत मिळाली. विभागीय निरीक्षक विनायक शिंदे यांच्या हस्ते गोरडे यांचा सत्कार करण्यात आला. गोरडे येत्या ८ ऑगस्ट रोजी ४२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहेत.

त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल अर्जुन मोरे, रवींद्र परदेशी, सोपान गडाख, सोमनाथ गवारी, शैलेश शीलवंत, राहुल गजरे आदींनी त्यांचे कौतूक केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe