सुपा ग्रामपंचायतीत या पॅनलची सत्ता

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात आज मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे. अनेक ठिकाणी राजकीय सत्ता कायम ठेवण्यास अनेक पक्षांना यश मिळाले आहे. तर काही ठिकाणी धक्कादायक पराभवाला देखील सामोरे जावे लागत आहे.

नुकतेच पारनेर तालुक्यातील महत्वाची असणार्‍या सुपा ग्रामपंचायत निवडणुकीत राजू शेख यांच्या पॅनलचा विजय झाला आहे. 15 जागांपैकी शेख यांचे 8 उमेदवार निवडून आले असले तरी या निवडणुकीत पॅनल प्रमुख शेख याचा धक्कादायक पराभव झाला आहे.

विरोधी माजी सभापती दीपक पवार यांच्या पॅनलला सहा जागांवर समाधान मानावे लागले असून अपक्ष तथा भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सागर मैड यांचा सुपा ग्रामपंचायत सदस्यपदी विजय झाला आहे.