अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :आजवर आपण सरकरी नोकरदाराकडे मोक्याची जागा, किमती गाडी,मौल्यवान दागिने असल्याचे पहिले आहे. परंतु पारनेर तालुक्यात सरकरी नोकरदाराने चक्क गावठी दारूचा अड्डा सुरू केला असल्याचे समोर आले आहे.
समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तालुक्यात. एकीकडे ज्या अण्णांनी सरकरला देखील वठणीवर आणले, अन दुसरीकडे त्यांच्याच तालुक्यात असा प्रकार म्हणजे हे मोठे दुर्भाग्य आहे.
याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील कृषी विभागात कार्यरत असणाऱ्या एका कृषी सहायकाने राळेगण थेरपाळला शिरूर-बेल्हा रस्त्यालगत कारखिलेवस्ती शिवारात जागा खरेदी केली.
तसेच तेथे हॉटेल इमारत बांधून तेथे गावठी दारूचा अड्डा सुरू केला. मागील दोन वर्षांपासून तेथे गावठी व देशी-विदेशी दारूची अवैध विक्री केली जात आहे. परिसरातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या होत्या.
त्यानुसार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनीही संबंधिताला दारू विक्री बंद करण्यास सांगितले.परंतु माझ्या मालकीच्या जागेत मी काहीही करील, अशी उत्तरे दिली होती.
या व्यक्तीचा धाबाही असून, त्याबाबत संस्थेने पोलिसांकडे अवैध दारू विक्रीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. कृषी विभागाकडेही या अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी केली आहे.
आता राळेगण ग्रामपंचायतीने संबंधिताला दारू विक्री बंद करण्याची नोटीस पाठविली आहे. याबाबत वरिष्ठ म्हणतात मला या प्रकरणाची नुकतीच माहिती मिळाली आहे.
संबंधित कर्मचारी आमच्या विभागाचा आहे. मात्र त्याने कुठे जागा घेऊन काय व्यवसाय सुरू केला आहे, याबाबत मला कल्पना नाही. संबंधित कर्मचाऱ्याकडे चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews