महिला कुस्ती मल्ल विद्या महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रतिभा डोंगरे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-  महिला कुस्ती मल्ल विद्या महासंघाच्या अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे हिची निवड करण्यात आली.

महासंघाचे संस्थापक पै.गणेश मानगुडे यांनी डोंगरे हिची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा करुन, नियुक्तीपत्र ऑनलाईन प्रदान केले. महिला मल्ल घडविण्यासाठी व कुस्ती खेळाला चालना देण्याकरिता कुस्ती मल्ल विद्या महासंघ महाराष्ट्रात कार्यरत आहे. नुकतीच अहमदनगर जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली आहे.

महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली प्रतिभा डोंगरे ही निमगाव वाघा येथील खेळाडू असून, ती न्यु आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयात शिकत आहे. ती नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांची कन्या असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

तसेच प्रतिभाच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुक्यातील सात ते आठ मुली कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे. तीने राज्य शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण तर राज्य शालेय ज्युदो स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले आहे. तीने 30 ते 40 राज्यस्तरीय कुस्ती व ज्युदो स्पर्धेत सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. तर राष्ट्रीय स्पर्धेत मजल मारुन जिल्ह्याचे नांव उंचावले आहे.

मानगुडे यांनी कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी महिला कुस्तीपटूंनी विशेष प्रयत्न करुन या खेळात जास्तीत जास्त सहभाग वाढविण्याचे आवाहन केले. प्रतिभा डोंगरे हिने ग्रामीण भागातील महिला कुस्तीपटूंना चालाना देण्यासाठी व त्यांना सोयी, सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महासंघाच्या माध्यमातून कार्य करणार असल्याचे स्पष्ट केले.

या निवडीबद्दल जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे व कुस्ती मल्ल विद्या महासंघाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद जपे यांनी प्रतिभाला शुभेच्छा दिल्या. या निवडीबद्दल तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment