अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-राज्यासह जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला असताना नगर जिल्ह्यात केवळ कोविड रुग्णालया करिता सेन्ट्रल ॲाक्सिजन टँक उभारणारे प्रवरा मेडिकल ट्रस्टचे रुग्णालय एकमेव असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डा.ॅ राजेंद्र विखे यांनी मंगळवारी दिली.
प्रवरा मेडिकल ट्रस्टने कोविड रुग्णालयात सेन्ट्रल ॲाक्सिजन टॅक ही आधुनिक यंत्रणा बसवली आहे. या सुविधेचे लोकार्पण डाॅ. विखे यांच्या हस्ते झाले
त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी कुलगुरु डाॅ. वाय. एम. जयराज, मेडीकल काॅलेजचे अधिष्ठाता डाॅ. राजवीर भलवार, डाॅ. सतीश महाजन, डाॅ. रविंद्र कारले, डाॅ. शरियार रोशनी, डाॅ. राहुल कुंकुलोळ, महेश तांबे आदी उपस्थित होते.
डाॅ. विखे म्हणाले, राज्यात वाढणारा कोरोनाचा संसर्ग पाहता सगळीकडे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र या काळातही काही स्थानिक एजन्सीच्या मदतीने कोविड रुग्णालयात ॲाक्सिजन पुरवठा ट्रस्टने सुरळीत ठेवला होता.
मात्र भविष्यातील गरज ओळखुन सेन्ट्रल ॲाक्सिजन टँक आम्ही नव्याने याठिकाणी बसवले आहे. आता एक महिना पुरेल इतका ऑक्सिजन या सिस्टीमने रुग्णालयात देता येणार आहे.
या यंत्रणेमुळे वेळ, पैसे आणि ऑक्सिजनची उपलब्धता यात मोठी बचत होणार आहे. कोविड रुग्णांसाठी अधिकच्या सेवा देण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved