अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे जवळपास भरलेच आहेत.
भंंडारदरा धरण ९८ टक्के तर निळवंडे धरण ८६ टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात काल, परवा झालेल्या जोरदार पावसाने निळवंडेत जोरदार पाण्याची आवक झाली.
त्यामुळे धरणातून १२ हजार ९४५ क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आल्याने प्रवरा नदीला पूर आला आहे. तालुक्यातील कोकणेवाडी, निंब्रळ, इंदोरी, अगस्ती पुलांवरून पाणी वाहत आहे.
शनिवार व रविवार या चोवीस तासात घाटघर येथे २५० तर रतनवाडी २२५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. भंडारदरा धरणात १० हजार ७४९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे.
विद्युत गृह -१ मधून ८१६ व स्पिलवे वरून ६ हजार ९२४ क्युसेक असा एकूण ७ हजार ७५० क्युसेकने विसर्ग सुरू सुरू आहे धरणात २४ तासात ५९५ दशलक्ष घनफूट नव्या पाण्याची आवक झाली आहे.
वाकी तलावतून २ हजार ५४५ क्यूसेकने ओव्हर फ्लो विसर्ग निळवंडे धरणात जमा होत आहे निळवंडे धरणाचा पाणीसाठा ७ हजार २०८ दशलक्ष घनफूट झाला आहे.
विद्युत गृह केंद्रातून ७१० व सांडव्यातून १२ हजार २३५ असा एकूण विसर्ग १२ हजार ९४५ क्युसेकने प्रवरा नदीपात्रात पाणी झेपावले आहे
कोतूळ येथे मुळा नदी विसर्ग ८ हजार ३७३ क्युसेक आहे. भंडारदरा परिसरात वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. परीसरातील निसर्ग सौंदर्य बहरले असून घाटघर धुक्यात हरविले आहे.
१५ ऑगस्ट आणि त्यानंतरचा हा काळ म्हणजे भंडारदरा परिसरात येणाऱ्यांची मांदियाळी असते. परंतु यंदा कोरोनाच्या सावटामुळे याठिकाणी वातावरण पर्यटकांविना सुने सुने आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved