अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-आम्ही पोलीस आहोत, गाडीत काय माल भरला आहे.अशी चौकशी करत रजिस्टरवर सही करण्याच्या बहाण्याने टेम्पो मधील क्लीनर साईटच्या सीट खाली ठेवलेले २७,१०० रुपये चोरून नेल्याची घटना मंगळवार दि.१६ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नगर दौंड रस्त्यावर निमगाव खलू गावाजवळील शांताई लॉन्स नजीक घडली आहे.
सदर घटनेबाबत ट्रकचालक लखन नायक रा बगवा,जि.खरगोन,मध्यप्रदेश यांनी दिलेल्या खबरीवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला तीन अनोळखी इसमानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवार ि.द१६रोजी सदर टेम्पोचालक हा नगर दौंड रस्त्याने जात असताना बिगर नंबर प्लेटच्या अपाची दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमानी शांताई लॉन्स नजीक सदर टेम्पो चालकाला दुचाकी आडवी लावत टेम्पो थांबवण्यास सांगितला.
दुचाकीवर आलेल्या त्या अनोळखी व्यक्तींनी आपण पोलिस असल्याचे सांगत चालक व क्लीनरला खाली बोलावले. त्यांच्याकडे चौकशी करत त्यांना एका रजिस्टरवर सही करण्यास सांगितले,
चालक व क्लीनरला बोलण्यात गुंतवून त्यातील एका इसमाने टेम्पोमधील सीट खाली ठेवलेली २७,१००रुपये रोख रक्कम चोरुन नेली टेम्पो मध्ये चढल्यानंतर चालकाला पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.श्रीगोंदा पोलीस पुढील तपास करत आहेत.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved