अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु अनेक खासगी हॉस्पिटलकडून मात्र या रुग्णांची लूट होत असल्याचे
समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यावर अंकुश ठेवण्यासाठी एक समिती स्थापन केली. शहरातील 19 खासगी हॉस्पिटलमधून कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या तपासणीनुसार सोमवार (दि.14) अखेर 45 लाख 28 हजार रुपयांची जादा बिल आकारणी झाल्याचे समोर आले आहे.
याबाबत तपासणी समितीने आपला अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. अहमदनगर शहराचा विचार करता जिल्हा प्रशासनाने 28 खासगी रुग्णालयांना उपचार करण्यासाठी परवानगी दिली होती. जिल्हा प्रशासनाने उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्ह्यात सरकार ऑडिटर यांची पथके तयार करून रुग्णालयनिहाय कोरोना रुग्णांच्या बिलाची तपासणी मोहीम हाती घेतली. यात सोमवारीअखेर तब्बल 45 लाख 28 हजार रुपये कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांकडून संबंधित खासगी हॉस्पिटलने उकळले असल्याचे समोर आले आहे. ही सर्व बिले एक लाख रुपयांच्या पुढील आहेत.
नगर शहरातील खासगी हॉस्पिटल आतापर्यंत 2 हजार 552 रुग्णांनी खासगी रुग्णालयात कोरोनावरील उपचार घेतलेले आहेत. यातील 1 हजार 995 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 1 लाखांपेक्षा अधिक बिले आकरण्यात आलेल्या 287 बिलांची तपासणी पूर्ण झाली असून यात 150 बिलांत त्रुटी आढळली आहे.
त्रुटीची अथवा जादा आकारणी झालेली रक्कम ही 45 लाख 28 हजार आहे. जादा बिल आकारणी करणार्या खासगी रुग्णालयांत 10 लाख 26 हजार रुपयांची सर्वाधिक बिल आकारणी ही शहरातील सर्वात बड्या हॉस्पिटलने केलेली आहे. त्या खालोखाल 8 लाख ते 2 लाखांपर्यंत 6 हॉस्पिटलने जादा बिल आकरणी केलेली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved