अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- नेवासा तालुक्यात कार्यरत असणाऱ्या ‘उमेद’ संस्थेचे 700 च्या पुढे बचत गट आहेत. या ठिकणावरून अनेक महिलांनी कर्ज घेत आपले सक्षमीकरण केले आहे.
कर्जाचे वेळेवर परतफेडही केली आहे. परंतु जर याचे खासगीकरण झाले तर सावकारशाही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही
त्यामुळे या संस्थेचे खासगीकरण करण्यात येऊ नये अशी मागणी सुरेशनगरच्या माजी सरपंच अनिता उभेदळ यांनी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले की, महिलांच्या सामाजिक, आर्थिक विकासाला दिशा देण्यासाठी उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) बाह्य संस्थेकडे वर्ग करणार असल्याचे म्हटले जाते.
यामुळे पुन्हा सावकारशाही येऊ शकते. आमच्या सुरेशनगर गावात एकूण 9 महिला बचत गट असून, महिला नियमित कर्ज घेतात व परतफेड करतात.त्यामुळे महिला सक्षमीकरण झाले आहे. त्यामुळे खासगीकरण करू नये,
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved