बाजार समितीची जागा वाचविण्यासाठी आम्ही रिंगणात प्रा.शशिकांत गाडे यांची माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर टीका

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- पंचवीस वर्षाच्या कालखंडात आम्ही राजकारणात सक्रिय असतांना आम्ही कधीही ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घातले नाही.

माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांनी व त्यांच्या सहकार्यांनी पै-पै गोळाकरून नगर तालुक्याच्या विकासाठी मार्केट कमिटी स्थापन केली. तसेच झोपडी कँन्टिनच्या परिसरात तालुका दूध संघ आणि जिल्हा दूध संघाची इमारत उभी केली.

मात्र, काही विघ्नसंतोषी लोकांनी दूध संघ बंद पाडून इमारत विकून नगर तालुक्याचे वाटोळे केले. आता मार्केट कमिटीवर त्यांचा डोळा असून ती विकण्याचा प्रयत्न आहे.

हे रोखण्यासाठी नगर तालुक्यात महाविकास आघाडीने ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घातले असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले.

नगर तालुक्यातील मांजरसुंबा व डोंगरगण येथे ते बोलत होते. गाडे पुढे म्हणाले, महाविकास आघाडीने आज शेतकर्‍यांना कर्ज मुक्त करण्याचे काम केले आहे.

बँक व मार्केट कमिटी ताब्यात घेण्यासाठी शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून खेळत्या भांडवलाचे वाटप केले. हे कर्ज मार्च अखेर दहा ते बारा टक्क्यांनी पैसे शेतकर्‍याना भरावे लागणार आहे.

नगर तालुक्याची कामधेनु असणारी बाजार समिती ची दहा एकर जागा विकण्याचा डाव कर्डिलेंचा आहे. दूध संघ कवडी मोलाच्या भावाने विकला आता बाजार समितीच्या जागेवर कर्डिले यांचा डोळा आहे.

तसेच या निवडणुकीत मतदाराना आता फोन येणार आहे. शेळके म्हणाले नगर तालुक्याची अपप्रवृत्तीच्या लोकांना त्याची जागा दाखवण्यासाठी एकत्र आलो आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe