Property Card : अहिल्यानगर जिल्ह्यातील ८ हजार मालमत्ता पत्रक ! ड्रोनच्या सहाय्याने सर्व्हेचे कामकाज पूर्ण

Mahesh Waghmare
Published:

अहिल्यानगर : स्वामित्व योजनेच्या अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील ८ हजार मालमत्ता पत्रकाचे अभासी वितरण शनिवारी (दि. १८) पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे व राज्याचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती भूमिअभिलेख प्रभारी जिल्हा अधिक्षक अविनाश मिसाळ यांनी दिली आहे.

श्री. मिसाळ म्हणाले की, राज्य महसूल, भूमिअभिलेख, राज्य पंचायत राज आणि भारतीय सव्र्व्हिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामित्व योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेद्वारे गावातील मिळकत धारकाला मालमत्तापत्रक उपलब्ध करून देताना

दस्तऐवजाचा हक्क प्रदान केला जात आहे. आत्तापर्यंत या योनजेअंतर्गत देशातील ३.१७ लाख गावामधून ड्रोन सर्वेचे कामकाज भूमिअभिलेख विभागामार्फत पूर्ण करण्यात आले आहे. १.१९ गावातून २.१९ कोटी मालमत्ता पत्रक तयार करण्यात आले आहे.

१८ जानेवारी रोजी देशातील सुमारे ५० लाख मालमत्ता पत्रकाचे आवासी वितरण करण्यात येणार आहे. यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत. स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या निवासी मालमत्तेच्या मालकीबाबत मालमत्ता विषयक कागदपत्र उपलब्ध झाले आहे.

स्वामित्व योजनेला विशेष महत्व प्राप्त झाले असून, मालमत्तेवर कर्ज उपलब्ध करता येणार आहे. तसेच मालमत्तेचे विवाद कमी होतील, गावविकास नियोजनात सुलभता प्राप्त होईल, ग्रामपंचायतला स्वउत्पन्नाचे स्वउ स्त्रोत उपलब्ध होण्यास मदत होईल.

या योजनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे, असे श्री. मिसाळ यांनी नमूद केले.याचाच एक भाग म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील ८ हजार मालमत्ता पत्रकाचे वितरण करण्यात येणार आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe