अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यातील ८ गुन्हेगारांचे हद्दपारीचे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिली.
गणेश बाळासाहेब शेंडगे(वय 22 वर्ष, राहणार चिंचोली फाटा) अभिषेक गोरख मोरे( वय 20 ,वर्ष राहणार, तनपुरे वाडीरोड राहुरी) विशाल सुनील जगधने( वय 20 वर्ष ,राहणार तनपुरे वाडी),
सुधाकर शिवाजी वर्पे (वय 35 वर्ष ,राहणार पिंपळगाव फुणगी), रवींद्र उर्फ भोंद्या सूर्यभान माळी(वय 22 वर्षे ,राहणार बारागाव नांदूर), नितीन उर्फ ढोल्या उर्फ नानासाहेब विधाटे (वय 20 वर्ष ,राहणार ताहराबाद),किरण उर्फ विकी बबन थोरात (वय 25 वर्ष, राहणार चिंचोली फाट), दत्तात्रय भाऊसाहेब शिरसाट (वय 40 वर्ष राहणार कोल्हार)
या इसमांवर दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्यावर प्रस्थापित कायद्यान्वये कारवाई होऊन देखील त्यांचे अपराधिक वर्तनात सुधारणा न झाल्याने सार्वजनिक शांतता अबाधित राहावी व सामान्य जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या हेतूने या गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक दुधाळ यांनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम