अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- पत्रकार परिषदेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना प्रश्न विचारल्याबद्दल महापालिका प्रशासनाने सामनाचे पत्रकार मिलिंद देखणे यांना नोटीस पाठविली आहे.
या प्रकाराचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे निषेध आम्ही निषेध करीत आहोत, अशी माहिती पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख व नगर जिल्हा निमंत्रक मन्सूर शेख यांनी दिली आहे.

प़श्न विचारणे हा पत्रकारांचा अधिकार आहे, हा मुलभूत अधिकारच मान्य न करण्याची मनपाची भूमिका तालिबानी असून या प़वृत्तीचा आम्ही तीव़ शब्दात निषेध करीत असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
प़सिध्दीस दिलेल्या पत्रकात देशमुख यांनी म्हटले आहे की, प़श्न विचारलयाने त्रागा करण्यापेक्षा मनपाने आपला कारभार सुधारून कोठे लसीचा काळाबाजार झाला त्याची चौकशी करणे आवश्यक होते..
मात्र असे न करता पत्रकारालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची मनपाची भूमिका आक्षेपार्ह आणि माध्यमांचा आवाज बंद करणारी आहे.. मनपाच्या अशा नोटिशीला आणि अरेरावीला आम्ही भीक घालणार नाही.
पालकमंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून नोटिस मागे घेण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत अन्यथा राज्यातील पत्रकारांना रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीतर्फे देण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम