आंदोलकांनी दिला इशारा; कामासाठी धावले ते सरा सरा…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-श्रीरामपूर तालुक्यातील नर्सरी ते देवळाली प्रवरा या रस्त्याचे काम पूर्ण होऊन एक वर्षही उलटलेले नाही, तोच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना खूप कसरत करावी लागत होती.

दरम्यान या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाबाबत टॅक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनिल मुथ्था यांनी घेराव आंदोलनाचा इशारा देताच या रस्त्याच्या डागडुजीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे.

नर्सरी ते देवळाली प्रवरा हा रास्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर लहान-मोठे अपघात होऊन वादावादी होण्याचे प्रसंग नित्याचे झाले होते.

या पार्श्वभूमीवर मुथा यांनी रस्त्याचे काम सुरू न झाल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी सदर रस्त्याचे काम सुरू केले आहे. सध्या खड्डे बुजविण्याचे काम चालू असून नंतर त्यावर पूर्ण कार्पेट मारला जाईल, असे संबंधितांकडून सांगण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News