अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- नेवासा शहरात मागील महिन्यापासून सातत्याने होणारी रुग्ण वाढ ही चिंता वाढवणारी असल्याने ही साखळी तोडण्यासाठी १५ मे ते २३ मे या कालावधीत जनता कफ्र्यु करण्यासाठी नेवासकर नागरिकांसह व्यापाऱ्यांनी पुढे यावे,असे आवाहन नेवासा नगरपंचायतचे नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,मागील वर्षी कोरोनाची महामारी सुरू झाली असताना शहरातील अनेक नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी प्राण गमावले आहे,
व्यापारी वर्गाचे यात खूप मोठे नुकसान झाले आहे.नेवासा शहराच्या व्यापारावरही यामुळे खूप मोठा परिणाम झाला आहे.
रोज नेवासा शहरातील तरुण पॉझिटीव्ह होत आहे.मागील महिन्यापासून ही रुग्णसंख्या सातत्याने वाढतांना दिसत असताना शहरात फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही.
त्यामुळे सर्वांनी मिळून कोरोनाच्या विरोधात लढा द्यावा लागेल व त्यासाठी सर्वांच्या हितासाठी घरात राहून जनता कफ्र्युला पाठिंबा देऊन साथ द्यावी,असे आवाहन सर्व नगरपंचायतच्या नगरसेवकांनी केले आहे.
कोरोनाचा नेवासा शहरातील वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी या जनता कफ्र्युच्या काळात फक्त दवाखान्यासह मेडिकल या अत्यावश्यक सेवा चालू राहतील.
बाकी सर्व दुकाने बंद राहातील. तरी सर्वांनी नागरिकांसह व्यापाऱ्यांनी गावाच्या हिताच्या दृष्टीने सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
जनता कफ्र्यू दरम्यान शहरात विनाकारण बाहेर फिरताना आढळ्यास त्यांची रॅपिड टेस्ट करून तो व्यक्ती जर पॉझिटिव्ह आला तर त्यांची रवानगी कोविड सेंटर येथे केली जाईल.
या काळात दुकाने उघडल्यास दुकानांवर कडक कार्यवाही केली जाईल.असे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|