अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- राहुरी शहर तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या या मुद्द्यावर चार दिवस जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढत आहेत.
संमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण जास्तप्रमाणात आढळले आहेत. आता राहुरी तालुक्यात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे.
राहुरी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने कोरोनाचे संक्रमण वाढू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर हा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला.
परंतु यामधून पतसंस्था व बँका यांना मात्र सूट दिली आहे.यामुळे सोमवारी शहरात कडकडीत बंद पाळला जात असताना मात्र पतसंस्था व बँकेच्या दारात झालेली गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवणारी ठरली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा