पुणे-शिर्डी खासगी लोकल रेल्वेसेवा, प्रस्ताव पाठवणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-  पुणे-शिर्डी खासगी लोकल रेल्वेसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव ‘मेरे देश मे मेरा अपना घर’ आंदोलन, पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदच्या वतीने २० डिसेंबरला हुतात्मा स्मारकात मांडण्यात येणार आहे.

माजी खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते या प्रस्तावाचे पूजन करून केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना तो पाठवण्यात येईल.

लोकल सुरू झाल्यास शिर्डीला येणाऱ्या भाविकांची सोय होऊन साईबाबांच्या विचारांचा प्रसार होण्यास मदत होईल. शिवाय विकासापासून वंचित राहिलेल्या नगर शहराला व्यापाराच्या दृष्टिकोनातून चालना मिळले. बुलेट ट्रेनपेक्षा ही लोकल सेवा अत्यंत महत्त्वाची असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News