Ahmednagar News : गेल्या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्रासहित देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये रस्ते विकासाच्या कामांनी जोर पकडला आहे. या काळात हजारो किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे जाळे विकसित करण्यात आले आहे.
महत्वाचे म्हणजे अजूनही अनेक प्रकल्पांची कामे सुरूच आहेत. तसेच काही प्रकल्पांची कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीन फील्ड महामार्गाचा देखील समावेश होतो. या ग्रीन फीड महामार्गाचे अलाइनमेंट एनएचएआय आणि एमएसआरडीसीने पूर्ण सुद्धा केले आहे. मात्र आता हे जुने अलाइन्मेंट बदलण्यात येणार अशी बातमी हाती आली आहे.
225 किलोमीटर लांबीच्या महामार्गामुळे छत्रपती संभाजीनगर-पुणे प्रवास फक्त 2 तासात
खरेतर, या एक्स्प्रेस-वेसाठी एनएचएआय अन एमएसआयडीसीमध्ये जून महिन्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. पण, असे असतानाचं आता जुने अलाइन्मेंट चेंज होणार अशा बातम्या समोर आल्या आहेत.
खरंतर छत्रपती संभाजीनगर ते पुणे यादरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या नवीन ग्रीनफिल्ड महामार्गामुळे या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास अवघ्या दोन ते सव्वा दोन तासात पूर्ण करता येणार आहे. हा महामार्ग 225 किलोमीटर लांबीचा राहणार असून हा एक सहा लेनचा महामार्ग राहणार असून बीओटी तत्त्वावर बांधला जाणार आहे.
हा प्रकल्प जवळपास 25 हजार कोटी रुपयांचा राहणार आहे. आधी हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पूर्ण केला जाणार होता. पण आता हा प्रकल्प दुसऱ्या संस्थेकडे वर्ग करण्यात आला आहे. एन एच आय कडून हा प्रकल्प आता महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळाकडे ट्रान्सफर करण्यात आला आहे. मात्र या प्रकल्पासाठी NHI आणि एमएसआरडीसीकडून अंतिम करण्यात आलेले अलाइनमेंट आता चेंज होणार अशा चर्चा आहेत. अशा परिस्थितीत आज आपण हे अलाइनमेंट नेमके कसे बदलू शकते याबाबत आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे असेल नवीन अलाइन्मेंट ?
मिळालेल्या माहितीनुसार पुणे-छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे चे बिडकीनला जोडणारे अलाइन्मेंट बदलले जाणार आहे. आधीचे अलाइन्मेंट जोड रस्त्याला बिडकीन वसाहतीच्या दक्षिण-पूर्व टोकाला जोडणारे होते.
पण यात बदल होईल अन बिडकीनला जोडणारा रस्ता छत्रपती संभाजीनगर-पुणे एक्स्प्रेसवेवरून बिडकीन ऑरिक वसाहतीच्या लगत थेट पैठण रस्त्याला जोडला जाणार आहे आणि पुढे वाळूजच्या दक्षिण-पश्चिम दिशेने समृद्धी महामार्गाला जोडण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. असे झाल्यास बिडकीन नोड थेट समृद्धी महामार्गाला जोडले जाणार आहे.
तसेच, जालना रस्त्यावरील केम्ब्रिज शाळेपासून सुरू होणारे अलाइन्मेंट सुद्धा चेंज होणार आहे. नवीन बदलामुळे आता पैठण रोड, बिडकीन जोड रस्त्याने थेट या द्रूतगती महामार्गावर जाता येऊ शकते. केंब्रिज शाळेलगत सुरू होणारा रस्ता समृद्धीला जोडला जाणार आहे. तसेच, शेंद्रा वसाहत, बिडकीन, कसाबखेडा, असा अर्धवर्तुळाकार बायपास झाल्यास, शहरालगत गोलाकार बाह्यवळण रस्ता निर्माण होणार आहे. तथापि, अलाईनमेंट चेंज होण्याच्या वृत्तांला अजून दुजोरा मिळालेला नाही.