Ahmednagar News : देवीची प्राणप्रतिष्ठा करून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला ! ग्रामसेवकासह चिमुरडीचा मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अपघातांची मालिका संपण्याचे नाव घेत नाही. अपघाताच्या काही घटना ताजा असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दुचाकींच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू झाला आहे.

ही घटना शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर चापडगावजवळ घडली. मंगळवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. या अपघातामध्ये इतरही तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अशोक विक्रम उगले, (वय ४०) , अवनी अशोक उगले (वय ८) अशी मृत बापलेकींची नावे आहेत.

उगले हे सहकुटुंब दुचाकीवरून बेलगाव येथून शेवगावकडे येत होते. बेलगाव येथील उगले परिवाराने गावात देवीचे मंदिर बांधले आहे. मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून अशोक उगले हे पती, मुलगा व मुलगीसह शेवगावकडे येत होते.

तेव्हाच हा अपघात झाला. चापडगावनजीक हॉटेल कांचनसमोर दुचाकीची जोरदार धडक बसली. त्यात अशोक उगले जागीच ठार झाले. त्यांची पत्नी पूनम, मुलगा शिवदीप व मुलगी अवनी व समोरील दुचाकीवरील अमोल नेमाने हे गंभीर जखमी झाले.

उपचार सुरू असताना अवनीचे बुधवारी सकाळी निधन झाले. अशोक उगले आखेगाव व माळेगाव ने येथे ग्रामसेवक असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe