प्रा. स्वाती वाघ यांना पीएच.डी. जाहीर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :-  बुर्‍हाणनगर येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापिका स्वाती वाघ यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने वनस्पतीशास्त्र विषयात पीएच. डी. जाहीर केली.

त्यांनी इकॉलॉजिकल स्टडीज ऑन स्वॉईल अलगी ऑफ अहमदनगर डिस्ट्रिक या विषयामध्ये शोधप्रबंध औरंगाबाद विद्यापीठाला सादर केला.

त्यांना औरंगाबाद येथील सर सय्यद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मिलिंद जाधव यांनी मार्गदर्शन केले. प्रा. स्वाती वाघ यांचे श्री बाणेश्‍वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले,

तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व विश्‍वस्त, प्राचार्य डॉ. एस. एस जाधव शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी डॉ. गणेश कांगुणे, डॉ. चांगदेव अरसुले, डॉ. ज्योती वाघ, डॉ. अशोक तुवर यांनी अभिनंदन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe