‘त्या’ रुग्णाला तपासणाऱ्या तीन डॉक्टरांसह ११ जण क्वारंटाईन

Published on -

नेवासा : शहारातील एका रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे, त्यामुळे आता प्रशासन सतर्क झाले आहे.

नेवासा शहरातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्याने नेवासा शहरात अत्यावश्यक सेवाही दि.१९ एप्रिल रोजी सकाळी ६ पर्यंत बंद राहणार असल्याचे तहसीलदार रुपेश सुराणा यांनी सांगितले.

सोमवारी सकाळी प्रशासनाला जिल्हा प्रशासनाकडून या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची महिती मिळताच शहरातील चालू असलेल्या अत्यावश्यक सेवा बंद करून पूर्ण लॉकडाऊन करण्यात आला.

हा लॅकडाऊन अजून काही दिवस चालू राहण्याची शक्यता आहे. नेवासा शहरात राहणारा कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या या रुग्णाला सारी आजार झालेला असल्याची माहीती समोर येत असताना त्यातच या रुग्णाची कोरोना चाचणी घेण्यात आली.

त्यामध्ये हा रुग्ण पॉझिटीव्ह निघाल्याने त्याला पुढील उपचार्थ पुणे येथे हलविण्यात आले आहे. नेवासा तालुक्यात पहिल्या टप्प्यात एका रुग्णाला कोरोनाची बाधा झालेली होती.

१४ दिवसाच्या उपचारादरम्यान हा रुग्ण ठणठणीत बरा झाला. त्याला होम क्वारंटाईन करण्यात आलेले असताना दुसरा रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज झालेले असताना सर्वसामान्य जनताही कडकडीत बंद पाळून प्रशासनाला सहकार्य करताना दिसून येत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe