अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :पारनेरच्या नगरसेवकांचे पक्षांतरनाचे सत्तानाट्य महाराष्ट्रभर चर्चेचा विषय झाले. परंतु आता या नगरसेवकांना व शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुखांना सात दिवस होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.
कारण यांनी कोरोनाच्या काळात प्रवास केला असल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे. पक्षांतरनाच्या राजकीय नाट्यवेळी या सर्वांनी मुंबई येथे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
कोरोनाच्या काळात हा प्रवास झाल्याने त्यांना सात दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यात शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख उमाताई बोरुडेे,
नगरसेवक डॉ. मुद्दसर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने, तर या नगरसेवकांच्या व्यतिरिक्त लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय औटी, आनंदा औटी, साहेबराव देशमुख यांचा समावेश आहे.
आम्ही रीतसर ई-पास काढून एक दिवसाचा मुंबई प्रवास केला आहे. आमचा कार्यालयीन लोकांशिवाय इतर कोणाशीही संपर्क आला नाही, तरीसुद्धा जनतेच्या व आमच्या ही कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही क्वारंटाईन झालो आहोत.
सरकारी नियमानुसार आम्हाला सात दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आले असल्याचे नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews