अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- पणन संचालकांच्या परवानगीविना श्रीरामपूर येथील बाजार समितीने कांदा व्यापाऱ्यांना जागा वितरित करण्याचा प्रकार घडला आहे.
दरम्यान हि वितरित केलेली जागा त्वरीत रद्द करुन संबधीतावर कारवाई करण्याची मागणी माजी सभापती सचिन गुजर यांनी केली आहे.
पणन संचालकांची परवानगी न घेता येथील बाजार समितीने चार ते पाच कांदा व्यापार्यांना परस्पर जागा वितरीत केल्याचा आरोप गुजर यांनी केला आहे. या संदर्भात गुजर यांनी सहाय्यक निबंधक यांच्याकडे लेखी तक्रार केली.
असुन आमदार लहु कानडे यांनाही तक्रारीची प्रत पाठविली आहे. संबधित व्यापार्यांनी दोन दिवसांपुर्वी त्याठिकाणी आखनी करुन शेड उभारण्यास प्रारंभ केला.
असुन बाजार समितीच्या जागा विना परवानगी देण्यास सरकारची बंदी असताना बाजार समितीने कांदा व्यापार्यांना जागा वाटप केली.
बाजार समितीने वितरित केलेली जागा त्वरित रद्द करुन बाजार समिती व्यवस्थापनावर कायेदेशीर कारवाईची मागणी गुजर यांनी तक्रारीत नमुद केली आहे.
दरम्यान, लाॅकडाउन शिथिल झाल्यानंतर कांद्याची आवक वाढल्याने माल ठेवण्यासाठी व्यापार्यांची गैरसोय होत होती. सोशल डिस्टसिंच्या नियमांचे पालनासाठी तात्पुर्त्या स्वरुपाचे शेड टाकण्यासाठी व्यापार्यांना जागा दिली आहे. यासंदर्भात संचालक मंडळाने तसा निर्णय घेतल्याची माहिती बाजार समितीचे सचिव किशोर काळे यांनी दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved