अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत.
तीन दिवसांपासून पावसाने मुळाच्या पाणलोटातील हरिश्चंद्रगड, आंबित, पाचनई या भागात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पाण्याची आवक सुरु असल्याने नगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे मुळा धरणामध्ये पाण्याची आवक वाढत चालली आहे.
या धरणाची २६ हजार दलघफू क्षमता आहे. मुळा धरणात ४२२७ क्युसेकने आवक होत आहे. या धरणात काल (सोमवार) सायंकाळी ६ वाजता २३ हजार १३० दलघफू (८९ टक्के) साठा झाला होता.
दरम्यान, भंडारदरा पाणलोटातही पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे धरणात येणारी नवीन पाण्याची आवक मंदावली आहे. गत 12 तासांत केवळ 116 दलघफू पाणी दाखल झाले.
त्यामुळे विसर्ग कमी धरण्यात आला असून तो सध्या 816 क्युसेकने सुरू आहे. धरणात काल सायंकाळी 10749 दलघफू पाणीसाठा होता. निळवंडे धरणातही आवक कमी झाली आहे.
निळवंडेतून केवळ 710 क्युसेकने प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, १५ ऑगस्ट व त्यानंतरचा विकेंडचा काळ हा पर्यटकांसाठी पर्वणीच असतो.
मुळा, भंडारदरा धरणाच्या भागात तोबा गर्दी होत असते. निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची आणि आनंद लुटण्याची संधी आणि आनंद पर्यटक घेत असतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved