मुळा धरण आज पूर्ण भरण्याची शक्यता, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधान !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- मुळा धरण काठोकाठ भरायला आता हवी आहे आणखी दीड फूट पाणी पातळी. सोमवारी केव्हाही धरणातून मुळा नदीपात्रात पाणी झेपावणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रविवारी धरण परिसर हौशी मंडळींच्या गर्दीने फुलाला होता. २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेचे मुळा धरण ऑगस्टमध्ये ओव्हरफ्लो होण्याचे प्रसंग कमी वेळा आले आहेत. मागील आठवड्यात पावसाचा जोर वाढल्याने ऑगस्ट अखेर धरणातून मुळा नदीत पाणी झेपावणार आहे. अलिकडच्या काळात घाटमाथ्यापेक्षा धरणाजवळील क्षेत्रात चांगला पाऊस झाला.

नंतर पाणलोट क्षेत्रातील पावसाची भर पडली. रविवारी सकाळी धरणात ४२२ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. धरणातील पाणीसाठा २४ हजार ८४० दशलक्ष घनफूट म्हणजे ९६ टक्के इतका झाला आहे.कोतूळकडून मुळा नदीतून ५३२७ क्युसेक पाण्याची आवक सुरु होती.

ती दुपारनंतर कमी झाली. मुळा धरण परिसरात पावसाने विश्रांती घेतली असली, तरी आतापर्यंत विक्रमी ७१६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तुलनेने कोतूळ येथे कमी म्हणजे ४८७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दुपारी पाणी पातळी १८१०.२० फुटांवर गेली असल्याने धरण भरायला अवघे दीड फूट पाणी राहिले आहे, अशी माहिती मिळाली.

सायंकाळी ६ वाजता कोतूळकडून धरणात ४०२४ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. पाण्याची आवक टिकून राहण्याची शक्यता आहे. ७ जूनला मृग नक्षत्राला सुरूवात झाल्यानंतर मुळा उजवा व डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र, घाटमाथ्यावर पाठ फिरवली होती.

जून व जुलै महिन्यात लाभक्षेत्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. तुलनेने कोतूळ येथे कमी म्हणजे ४८७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दुपारी पाणी पातळी १८१०.२० फुटांवर गेली असल्याने धरण भरायला अवघे दीड फूट पाणी राहिले आहे, अशी माहिती मिळाली.

मागील वर्षी आजच्या दिवशी मुळा उजवा व डावा कालव्याच्या लाभक्षेत्रासाठी पाणी आवर्तन सुरू असल्याने धरणाच्या पाणीसाठ्याची २४ हजार ७०५ दशलक्ष घनफूट नोंद झाली होती. ३० ऑगस्ट २०१९ रोजी कोतूळकडून ७१५ क्युसेक आवक सुरू होती.

रविवारी सायंकाळी पाणीसाठा २५ हजार ७१ दशलक्ष घनफूट झाल्याने धरण ९६.४० टक्के भरले. मागील वर्षी आजच्या दिवशी २४ हजार ७०५ दशलक्ष घनफूट नोंद झाली होती. आवक वाढल्याने राहुरी तालुक्यातील मुळा धरण ९६.४० टक्के भरले आहे. आज ते पूर्ण भरण्याची शक्यता आहे.

:आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserve

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment