अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे.
राहुरी तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण आहेत. कोरोना महामारीमध्ये पहिले चार महिने जशी नागरिकांनी काळजी घेतली, त्याचप्रमाणे शासकीय निर्देशांचे पालन करून गर्दी न करणे,
मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे व अनावश्यक बाहेर न पडणे इत्यादी काळजी घेऊन रुग्णांसाठी सुरू केलेले कोव्हिड सेंटर कायम रिकामे राहावे , असा आशावाद राज्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.
राहुरी तालुका डॉक्टर्स असोशिएशन व प्राजक्तदादा मित्र मंडळाच्यावतीने बालाजी मंगल कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी डॉ. शरद धावडे होते. तनपुरे म्हणाले, तालुक्यात चार महिने रुग्ण सापडले नाहीत, परंतु जिल्ह्याच्या सीमा खुल्या झाल्यानंतर आपल्याकडे प्रादुर्भाव वाढत गेला.
रुग्णांनी थोडीसुद्धा लक्षणे दिसल्यास आजार अंगावर न काढता त्वरित तपासण्या करून उपचार घेतल्यास निश्चित रुग्ण बरा होतो, अशी खात्री तनपुरे यांनी दिली.
या कोव्हिड केअर सेंटरमध्ये आपले रुग्ण लवकर बरे होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. होम आयसोलेशन ही काळाची गरज असून
यासाठीच स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होण्यासाठी नगरपरिषदेने मंजूर केलेल्या पहिल्या टप्प्यातील 230 तर दुसर्या टप्प्यातील 430 घरांच्या घरकुल अनुदान वर्ग केले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved