कत्तलखाण्यावर छापा:तब्बल साडे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- शहरातील झेंडीगेट परिसरातील एका बंद रुममध्ये गोवंशीय जनावराची कत्तल चालु असलेल्या कत्तलखान्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकुन एकुण १३ लाख ५२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यात १४०० किलो वजनाचे गोवंशीय मासाचे मोठ-मोठया आकाराचे तुकडे व ११ लाखांचा एक आयसेर टेम्पो (क्र.एम.एच १६ सी.सी. ०६१४ ) ताब्यात घेण्यात आला.

याप्रकरणी आसिफ गुलाम दस्तगिर शेख,( वय ३३ वर्षे, रा. हामालवाडा, झेंडीगेट,अहमदनगर), शहानुर इस्माईल शेख,(वय ३६ वर्षे, रा. आंबेडकर चौक, झेंडीगेट, अहमदनगर),

मोईन असरार सय्यद,( वय ३५ वर्षे, रा.आंबेडकर चौक, झेंडीगेट, अहमदनगर), सलमान अजिज शेख,( वय १९ वर्षे, रा. गॅरेज लाईन, कोठला,अहमदनगर ),मोहम्म गौस कुरेशी,

( वय ३५वर्षे, रा. आंबेडकर चौक, झेंडीगेट, अहमदनगर )व निहाल इस्माईल कुरेशी,(रा. तांबोळी किराणा दुकानाशेजारी, झेंडीगेट, अहमदनगर ) (फरार) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

वरील कारवाई बाबत कोतवाली पो.स्टे. येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील,

अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोडयांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक विशाल शरद ढुमे यांच्या नेतृत्वाखाली सफौ दत्तात्रय शिंदे,

पोहेकॉ सुयोग सुपेकर, पोना हेमंत खंडागळे, सचिन जाधव, महेश मगर, बाबासाहेब फसले व सागर द्वारके यांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment