श्रीरामपूर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस ! मोठी झाडे रस्त्यावर

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील वडाळा महादेव परीसरात काल गुरूवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यावेळी सुसाट वादळी वारे वाहत असताना अनेक लहान मोठे झाडे पडण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

शहरातील अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या वादळामुळे पडल्या असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडले होते. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसांपासून प्रचंड उष्णतेची लाट निर्माण झाली असून दैनंदिन वातावरणात बदल होऊन गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहे.

काल झालेल्या वादळी पावसात तालुक्यातील नेवासा रोड, बेलापूर रोड, संगमनेर रोडसह पुणतांबा रोडच्या कडेला असलेले छोटे-मोठे व्यावसाहिकांचे शेडनेट उडून नुकसान झाले आहे. हाच प्रकार परिसरातील निपाणी वडगाव येथे घडला असून गोपालक शेतकरी बांधवांचे प्रचंड हाल झाले आहे.

झाडे उन्मळून पडली

शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने मोठी झाडे रस्त्यावर उन्मळून पडली. झाडे रस्त्यावर पडल्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. काही ठिकाणी झाडे वीज वाहक तारांवर पडल्याने शहरात रात्री उशिरापर्यंत वीज गायब होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe