आई व मुलाच्या मृत्यूमुळे राळेगणसिद्धी परिवार हादरला ! गाव शोकाकुल….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 Ahmednagar News :-  श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी येथे भरधाव कंटनेर दुचाकीवर उलटल्याने कंटेनरखाली दबून झालेल्या अपघातात राळेगण सिद्धी (ता .पारनेर)येथील आई व मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

रविवारी सकाळी ६ .३० वाजता ही दुर्घटना घडली. पुण्याच्या दिशेने भरधाव जाणारा कंटेनर दुभाजक तोडून नगर रोडवर पलटी झाला.

शिरूरवरून दुचाकीवर स्वप्नील उर्फ बंडू बाळू मापारी ( वय २७ ) व त्यांची आई लक्ष्मीबाई बाळू मापारी ( वय ६२ ) हे राळेगण सिद्धीला घरी परतत होते,

पण अचानक दुभाजक तोडून कंटेनर ( एम एच ४६ – ए एफ ०२७२ ) थेट त्यांच्या अंगावरच पलटी झाला. त्यात स्वप्नील मापारी व लक्ष्मीबाई मापारी हे मायलेक कंटेनरखाली दबले.

या अपघातानंतर नगर पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

बाळू व त्याची आई हे दोघे पहाटेच कांदा विक्रीसाठी राळेगणसिद्धीवरून शिरूर (जि. पुणे येथे गेले होते. लसूण विक्री करून ते राळेगणसिद्धीकडे परतत असताना भरधाव कंटेनरखाली त्यांची दुचाकी चिरडली गेली.

चूक नसताना माय लेकरांना आपला जीव गमवावा लागला. दोन वर्षांपूर्वी स्वप्नील याचा विवाह झाला होता. त्याचा संसार फुलण्याआधीच काळाने क्रूरपणे घाला घातला .

राळेगणसिद्धी गावात या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शोकाकुल वातावरणात राळेगणसिद्धी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe