हत्याकांडातील आरोपी बोठे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षारेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली.

या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बोठे अद्यापही फरार आहे. दरम्यान आता या कुरापती बाळाच्या अडचणीत भर पडली आहे. नुकतेच आरोपी बाळ बोठे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.

आता आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे. रेखा जरे हत्याकांडातील फरार आरोपी बाळ बोठे याच्या विरोधात आता तोफखाना पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

एका महिलाची माहितीचा अधिकाराचा अर्ज देऊन वैयक्तिक माहिती मागवून कार्यालयाची परवानगी न घेता निवडणूक लढवली म्हणून 10 लाखांची खंडणी मागितली होती.

या मुळे आता यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे यांच्यावर तोफखाना पोलिस स्टेशनात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

खंडणी न दिल्याने पेपर मध्ये बातमी देऊन अशी धमकी पत्रकार बाळ बोठेने त्या महिलेला दिली होती. सध्या पत्रकार पत्रकार बाळ बोटे फरार आहे. ते आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

दरम्यान दिवसेंदिवस बोठेच्या अडचणीत वाढ होत चालली आहे. दरदिवशी उघड होणारे धक्कादायक प्रकरणे यामुळे बोठे मोठ्या अडचणीत सापडला आहे.