रेखा जर यांना न्याय मिळवून देण्यासाठी कुटुंबीय कँडल मार्च काढणार

अहमदनगर Live24 टीम, 29  डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षारेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे.

या घटनेला २५ दिवस उलटले तरी मात्र जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी या घटनेचा मुख्य सूत्रधार बाळ बोठेला शोधण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही.

आरोपीला तातडीनं जेरबंद करून रेखा जरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी जरे यांच्या कुटुंबियांच्या वतीने बुधवारी दि. ३० रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भिंगारवाला चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावर कँडल मार्च काढण्यात येणार आहे.

३० नोव्हेंबरला जरे यांची हत्या झाल्यानंतर १ डिसेंबरच्या रात्री बाळ बोठे हा नजरेआड झाला तर शहरातील अनेक दिगाजांसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तसेच महिला संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या संदर्भात मौन बाळगणेच पसंत केले आहे.

म्हणून या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी जरे कुटुंबीयांनीच पुढाकार घेऊन जिल्ह्यातील जास्तीत नागरिकांनी यात सहभागी होऊन स्व. रेखा जरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.