अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-जातेगाव घाटात सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली.
अवघ्या दोन दिवसांत या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला. पाच आरोपी अटकेत असून, मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे पसार आहे.
रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील बालविकास प्रकल्प अधिकारी विजयामाला माने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने त्यांना आरोपींपासून जीविताला धोका असल्याचे सांगत त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
रेखा जरे यांची सोमवारी ३० नोव्हेंबरला रात्री हत्या करण्यात करण्यात आली होती. त्यांच्यासोबत माने या कारमध्ये होत्या. त्यांनी हे हत्याकांड प्रत्यक्ष पाहिले आहे.
घटना घडल्यानंतर माने यांनीच जरे यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. रेखा जरे यांच्या गुन्ह्यात प्रत्यक्ष साक्षीदार असल्याने माझ्या जीवितास यामधील आरोपीपासून धोका असल्याचे माने यांनी सांगितले.
माने यांनी पोलिसांसमोर जबाब दिला आहे. मी सरकारी साक्षीदार असल्याने मला संरक्षण मिळावे अशी मागणी पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
दरम्यान नुकतेच रेखा जरे यांच्या मुलाने देखील एक धक्कादायक खुलासा केला आहे. मृत जरे यांच्या मुलाने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, बाळ बोठे हा गुंड प्रवृत्तीचा असल्याने व त्याने या आधीच आम्हाला संपवून टाकण्याची भाषा केली असल्याने त्याच्याकडून व त्याच्या समर्थकांकडून आमच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे.
आमच्या सर्वाचेच काही बरेवाईट झाल्यास त्यास सर्वस्वी बाळ बोठे हाच जबाबदार असणार असल्याची नोंद आपण घ्यावी. त्याच्याकडून आमच्या जिवीताला असणारा धोका विचारात घेऊन आम्हाला तातडीने पोलिस संरक्षण मिळावे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved