राहता : 19 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे, यातच जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींसाठी टक्के 78 टक्के मतदान झाले.

ग्रामपंचायत निहाय झालेली मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. हसनापूर 82, चंद्रापूर 75, जळगाव 84, एकरुखे 86, वाळकी 92, ममदापूर 82, अस्तगाव 86, नांदूर 82, रांजणगाव खुर्द 82, रामपूरवाडी 87, गोगलगाव 77

, लोणी खुर्द 66, आडगाव बुद्रुक 89, शिंगवे 84, पाथरे बुद्रुक 76, बाभळेश्वर 80, हनुमंतगाव 80, केलवड बुद्रुक 88, पिंपळवाडी 85 याप्रमाणे ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले आहे.

तालुक्यातील अस्तगाव, जळगाव, बाभळेश्वर, एकरूखे या गावांमध्ये मतदारांनी मोठ्या लांब रांगा मतदानासाठी लावल्या होत्या. तालुक्यातील वाळकी ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक 92 टक्के मतदान झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News